Homeआरोग्यमुळशी तालुक्यातील मांदेडे दत्तवाडी परिसरातील कोरड्या नळाचे पूजन करून महिलांचे अनोखे आंदोलन;...

मुळशी तालुक्यातील मांदेडे दत्तवाडी परिसरातील कोरड्या नळाचे पूजन करून महिलांचे अनोखे आंदोलन; हंडा मोर्चाचा इशारा.

मुळशी : मांदेडे दत्तवाडी परिसरातील पाणीटंचाईच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महिलांनी कोरड्या नळाचे पूजन करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

घरातील नळाला नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीप्रश्न तातडीने सोडवून परिसरात नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी महिलांनी केली.

दरम्यान, प्रशासनाने पाणीप्रश्नाची तातडीने दखल न घेतल्यास मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पंचायत समिती, मुळशी येथे हंडा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

पाणी हा नागरिकांचा मूलभूत प्रश्न असून, प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments