Homeसाहित्य/शैक्षणिकपिंपरी चिंचवडवाकड मेट्रो स्थानकासाठी पीएमपीएमएलची फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना दिलासा.

वाकड मेट्रो स्थानकासाठी पीएमपीएमएलची फीडर बस सेवा सुरू; प्रवाशांना दिलासा.

वाकड (प्रतिनिधी)

पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गिका क्रमांक ३ सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी पीएमपीएमएलकडून नवीन फीडर बस सेवा सुरू करण्यात आली आहे. ४ नोव्हेंबरपासून ११ नवीन बस मार्गांवर सेवा सुरू झाली असून एका विद्यमान मार्गाचा विस्तार करण्यात आला आहे.

महत्त्वाचे मुद्दे :

– पिंपरी मेट्रो स्थानक ते वाकड चौक मेट्रो स्थानकासाठी शटल बस सेवा.
– ताथवडे, पुनावळे, हिंजवडी आणि बालewाडी परिसराला मेट्रोची जोडणी.
– नवीन सेवांसाठी २२ बस थांबे निश्चित.
– दररोज ६२० बस फेऱ्यांचे नियोजन.
– आयटी कर्मचारी आणि मेट्रो प्रवाशांना प्रवासासाठी अधिक सुविधा मिळण्याची अपेक्षा.

मेट्रो आणि बस सेवांच्या एकत्रित वापरामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होण्यास तसेच खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments