Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरमुळशी तालुक्यातील मुठा गावामध्ये पशुपालकांना मका बियाण्यांचे वाटप; चारा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.

मुळशी तालुक्यातील मुठा गावामध्ये पशुपालकांना मका बियाण्यांचे वाटप; चारा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन.

पौड (प्रतिनिधी)

मुळशी:-पशुपालकांना जनावरांसाठी हिरवा व पौष्टिक चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने पशुवैद्यकीय चिकित्सालय मुठा येथे मका बियाणे वाटप व चारा साक्षरता अभियानाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद पुणे सदस्य शांतारामदादा बाजीराव इंगवले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

यावेळी पशुपालकांना चारा उत्पादन, संवर्धन, साठवणूक आणि योग्य नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यातील चारा टंचाईवर मात करण्यासाठी उपलब्ध चाऱ्याचा योग्य वापर करण्याचे आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमाला ग्रामसेवक भाऊसाहेब श्रीरसागर, माजी सरपंच सारिकाताई लक्ष्मण कुडले, मोहनराव झुंजुर्के, लक्ष्मण तुकाराम भरेकर, प्रकाश मोहोळ, सुभाष गायकवाड, मारुती गुंड, लक्ष्मण कुडले, प्रकाश ताकवले यांच्यासह सुमारे ४० पशुपालक उपस्थित होते. चारा नियोजनाबाबत जागृती आणि पशुपालकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments