
वाकड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड:-पिंपरी-चिंचवडमधील वाकड, पुनावळे, ताथवडे आणि परिसरातील काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
त्यामुळे अनेक रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी खासगी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे पुणे रिपोर्टच्या प्रतिनिधींनी संबंधित नागरिकांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली.
पवना धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल नागरिकांनी प्रश्न उपस्थित केले होते. सोसायट्यांना पुरेसे पाणी मिळण्यासाठी जलवाहिन्यांची क्षमता, वितरण व्यवस्था आणि पाण्याचा दाब यांची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली होती तरी या संबंधित पुढील उपाययोजना कराव्यात यासंदर्भात नागरिकांचे लक्ष वेधले आहे.





