
मुळशी प्रतिनिधी:- नवरात्रोत्सव व विजयादशमीनिमित्त समस्त ग्रामस्थ मंडळी, घोटावडे आणि श्री. सचिन विठ्ठलराव गोडांबे यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी व क्रीडापटूंचा जाहीर सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.
यावेळी पंचायत समिती सभापती मंदाताई बाबाजी शेळके यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करून मुळशी तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणारा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला.
कार्यक्रमाला संस्थेचे पदाधिकारी, ग्रामस्थ, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





