
वाकड प्रतिनिधी:-
पिंपरी-चिंचवड शहरात संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आल्याचे वृत्त आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करण्यासाठी महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच गृहनिर्माण सोसायट्यांनी उद्याने आणि झाडांसाठी पिण्याच्या पाण्याऐवजी प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पाण्याचा अपव्यय आणि अनधिकृत वापर रोखण्यासाठी तपासणी करण्यात येणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, हिंजवडी परिसरात या निर्णयाचा परिणाम होणार का , याबाबत नागरिकांचे मत व्यक्त होत आहे. हिंजवडीतील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि पाणीकपातीच्या अंमलबजावणीबाबत संबंधित प्रशासनाकडून अधिकृत होणार का याबाबत सर्वांचे लक्ष वेधले आहे.





