Homeअर्थ/उद्योगक्रीडापुणे ग्रँड टूरसाठी काँक्रीट रस्त्यांवर डांबरीकरण खर्चावर प्रश्नचिन्ह; स्पर्धेसाठी प्रशासनाची धावपळ.

पुणे ग्रँड टूरसाठी काँक्रीट रस्त्यांवर डांबरीकरण खर्चावर प्रश्नचिन्ह; स्पर्धेसाठी प्रशासनाची धावपळ.

पुणे प्रतिनिधी

पुणे शहर:- आगामी पुणे ग्रँड टूर २०२७ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रस्त्यांच्या कामांवरून प्रश्न उपस्थित होत आहेत. आधीच काँक्रीटीकरण केलेल्या काही रस्त्यांवर पुन्हा डांबरीकरण करण्यात येत असल्याने सार्वजनिक निधीच्या वापराबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दुसरीकडे, शहरातील अनेक विकास आराखड्यातील रस्ते, अपूर्ण पूल आणि वाहतूक कोंडीचे प्रश्न अद्याप कायम असल्याचे नागरिकांची समस्या नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी रस्त्यांची कामे करताना नागरिकांच्या दैनंदिन समस्यांनाही प्राधान्य द्यावे, अशी भूमिका मांडली जात आहे

रस्त्यांवरील कामांचा खर्च, काँक्रीटवर डांबरीकरण करण्याची तांत्रिक गरज आणि कामांचा दर्जा याबाबत महापालिकेने स्पष्ट माहिती द्यावी, त्यासंदर्भात नागरिकांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments