
पुणे : पुण्यातील ईएसआयसी (ESIC) रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सरू करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय आरोग्य व कुटुब कल्याण मंत्रालयाने मंज़री दिली आहे. या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून एमबीबीएसच्या ५० जागांवर प्रवेश प्रक्रिया सरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात माध्यमांशी बोलताना दिली.
पूण्यातील बिबवेवाडी येथील ईएसआयसी रुग्णालयात हे वैद्यकीय महाविद्यालय सरू होणार आहे. यापूर्वी या महाविद्यालयाचा प्रस्ताव दोन वेळा नाकारण्यात आला होता मात्र, आता केंद्र सरकारकड्न मंजुरी मिळाल्याने पुण्यात वैद्यकीय शिक्षणाच्या आणखी संधी उपलब्ध होणार आहेत.
या निर्णयामळे वैद्यकीय शिक्षण घेऊ डच्छिणाऱ्या विद्यार्थ्याना एमबीबीएस प्रवेशासाठी आणखी ५० जागांचा पर्याय उपलब्ध होणार आहे. तसेच राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या क्षमतेत वाढ होऊन भविष्यात डॉक्टरांची उपलब्धता वाढण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.





