
मुळशी : मुळशी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सेनापती बापट सभागृह, पंचायत समिती मुळशी येथे आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.या बैठकीत तालुक्यातील सद्यस्थिती, पाणीटंचाईची समस्या आणि दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
तालुक्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविणे, शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी ठोस पावले उचलणे, तसेच सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे, यावर बैठकीत भर देण्यात आला. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.
या बैठकीस तालुक्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी, विविध गावांचे सरपंच तसेच संबंधित शासकीय अधिकारी व शेतकरी बांधव आणि सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत यावेळी विचारविनिमय बैठकीत करण्यात आला.





