Homeसाहित्य/शैक्षणिकपुणे/उपनगरमुळशी तालुक्यातील पौड एसटी स्टँड परिसरात अस्वच्छतेचा विळखा! गटारांत प्लास्टिक-कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांच्या...

मुळशी तालुक्यातील पौड एसटी स्टँड परिसरात अस्वच्छतेचा विळखा! गटारांत प्लास्टिक-कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.

(पौड प्रतिनिधी):- मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण असून विविध शासकीय कार्यालयांचे महत्त्वाचे केंद्र म्हणून ओळखले जाते. येथे दररोज विविध कामांसाठी तालुक्यातील ग्रामीण भागातून नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची ये-जा सुरू असते.

मात्र, याच परिसरातील मुख्य रस्त्यालगतच्या गटारांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या आणि इतर कचरा साचल्याचे चित्र दिसत असल्याने स्वच्छतेच्या दाव्यांचे वास्तव काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शासकीय कार्यालयांचे केंद्र; मात्र स्वच्छतेचा अभाव!

पौड परिसरात मुळशी एसटी स्टँड, पोस्ट ऑफिस, पंचायत समिती, तहसील कार्यालय, दिवाणी न्यायालय, पोलीस स्टेशन, मोजणी कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आणि मुळशी प्रादेशिक पाणी विभाग अशी अनेक महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे या परिसरात दररोज मोठ्या संख्येने नागरिकांची वर्दळ असते.

शासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण मिळणे अपेक्षित असताना, मुख्य रस्त्यालगतच गटारांमध्ये कचरा साचलेला असल्याने परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्याच्या प्रशासकीय केंद्रातच अशी परिस्थिती असेल, तर ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या व्यवस्थेची स्थिती काय असेल, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होऊ शकतो.

मात्र, या परिसरातील अस्वच्छतेकडे संबंधित यंत्रणांचे पुरेसे लक्ष आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. आरोग्य विभाग, स्वच्छता कर्मचारी आणि संबंधित स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय ठेवून या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

पौडसारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय केंद्रात स्वच्छता राखणे ही केवळ औपचारिक जबाबदारी नसून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक बाब आहे. मुख्य रस्त्यालगतच्या गटारांमध्ये कचरा साचत असेल, तर त्याची नियमित पाहणी कोण करते? गटारांची साफसफाई किती वेळा केली जाते?

संबंधित यंत्रणांकडून या समस्येवर नेमकी कोणती कार्यवाही करण्यात आली आहे? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
या पार्श्वभूमीवर संबंधित प्रशासनाने परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून गटारांची तातडीने स्वच्छता करावी, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियमित स्वच्छतेचे नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments