Homeआरोग्यपिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा वाढता धोका! ऑक्टोबरमध्ये ८१ डेंग्यूचे रुग्ण; व मलेरियाचे १३ रुग्ण.

पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचा वाढता धोका! ऑक्टोबरमध्ये ८१ डेंग्यूचे रुग्ण; व मलेरियाचे १३ रुग्ण.

वाकड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड:- पावसाळा संपल्यानंतरही पिंपरी-चिंचवड शहरातील डासांचा प्रादुर्भाव कायम असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या ऑक्टोबर महिन्यातील अहवालानुसार, शहरात आतापर्यंत डेंग्यूचे ८१, तर मलेरियाचे १३ रुग्ण आढळले आहेत. याशिवाय स्वाइन फ्लूचे तीन रुग्णही नोंदविण्यात आले आहेत.

भोसरी, पिंपरी, चिंचवड, वाकड, थेरगाव, पिंपळे सौदागर, मोशी आणि चिखली परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.

शहरातील बांधकामांच्या ठिकाणी, रिकाम्या प्लॉटमध्ये, सोसायट्यांच्या टेरेसवर तसेच भंगार साहित्यामध्ये पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती वाढत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी परिसरात पाणी साचू न देण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी

घरातील पाण्याच्या टाक्या आणि भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत,आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा,ताप अंगदुखी किंवा डोकेदुखी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बांधकाम स्थळे आणि रिकाम्या जागांमध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी परिसराची स्वच्छता, साचलेल्या पाण्याचे व्यवस्थापन आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या उपाययोजनांकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments