Homeसाहित्य/शैक्षणिकइतरमुळशी तालुक्यातील उरवडे रोडवर शवपेटीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; बावधन पोलिसांकडून तपास...

मुळशी तालुक्यातील उरवडे रोडवर शवपेटीत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; बावधन पोलिसांकडून तपास सुरू.

मुळशी प्रतिनिधी :-उरवडे रोडवरील कार्पेट कंपनीजवळील माळरानावर शवपेटीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवार, दि. २० ऑक्टोबर रोजी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्याचे पोलीस आणि मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, उरवडे रोडवरील कार्पेट कंपनीजवळील माळरानावर नागरिकांना एक शवपेटी दिसून आली. याबाबत माहिती मिळताच बावधन पोलिसांसह मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी घटनास्थळी पोहोचून शवपेटी उघडली. त्यावेळी त्यामध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला.

प्राथमिक अंदाजानुसार, पहाटेच्या सुमारास रुग्णवाहिकेतून हा मृतदेह संबंधित ठिकाणी आणून ठेवण्यात आला असावा, अशी शक्यता बावधन पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, मृत महिलेची ओळख, मृत्यूचे नेमके कारण आणि हा मृतदेह तेथे कोणी आणून ठेवला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

या घटनेचा उलगडा करण्यासाठी बावधन पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह अन्य विविध मार्गांनी तपास करीत आहेत. या तपासातून महिलेची ओळख आणि घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

या घटनेमुळे उरवडे परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलीस तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments