Homeआरोग्यकाळेवाडीत स्वच्छता मोहीम; नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन.

काळेवाडीत स्वच्छता मोहीम; नागरिकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन.

वाकड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘स्वच्छ सुंदर PCMC’ उपक्रमाच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे काळेवाडी येथील मोरया कॉलनीतील मराठी शाळेच्या पाठीमागील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत २० हून अधिक नागरिक, सफाई कर्मचारी आणि संबंधित कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत परिसर स्वच्छ केला.

या मोहिमेदरम्यान परिसरातील पालापाचोळा, प्लास्टिक, गवत तसेच इतर प्रकारचा कचरा संकलित करण्यात आला. संकलित कचऱ्याचे वर्गीकरण करून तो घंटागाडीत टाकण्यात आला. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे आणि परिसरात कचरा साचू न देणे, याबाबत या उपक्रमातून जनजागृती करण्यात आली.

स्वच्छता मोहिमेदरम्यान नागरिकांना प्लास्टिक बंदीचे पालन करणे, कचऱ्याचे पाच प्रकारांत वर्गीकरण करणे, प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

स्वच्छ परिसर राखण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले. तसेच उपस्थित नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत परिसर स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला.

स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेची जबाबदारी रुजण्यास मदत होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments